विश्वासार्ह मराठी प्रकाशन

सिंधु प्रकाशन

दर्जेदार, विचारप्रधान आणि भावसमृद्ध साहित्याचा प्रवास

सिंधु प्रकाशन हे दर्जेदार, विचारप्रधान आणि भावसमृद्ध साहित्य प्रकाशित करणारे एक विश्वासार्ह प्रकाशन आहे. मराठी वाङ्मयाच्या समृद्ध परंपरेला आधुनिक दृष्टिकोनातून जोड देत, वाचकांना अर्थपूर्ण आणि प्रेरणादायी साहित्य उपलब्ध करून देणे हे आमचे ध्येय आहे.

समीक्षक, ललित लेखक आणि नाटककार यांच्या साहित्यपरंपरेतून प्रेरित, आम्ही विविध विषयांवरील पुस्तके प्रकाशित करतो. साहित्याच्या माध्यमातून मानवी जीवन, निसर्ग, संस्कृती आणि मूल्यांची सखोल अनुभूती वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा आमचा सतत प्रयत्न असतो.

अधिक वाचा
Sindhu Prakashan

आमचे प्रेरणास्थान

श्रीनिवास विनायक कुलकर्णी

श्रीनिवास विनायक कुलकर्णी यांचा जन्म कृष्णाकाठच्या सांगली जिल्ह्यातील औदुंबर या गावी झाला. लहानपणापासूनच कलेचे संस्कार लाभलेले आणि निसर्गाशी घट्ट नाते जुळलेले त्यांच्या संवेदनशील मनाने साहित्यविश्वात एक वेगळा ठसा उमटवला.

घरातील वातावरण, चित्रकलेची परंपरा आणि सतत प्रश्न विचारण्याची वृत्ती यांमधून त्यांच्या विचारविश्वाला आकार मिळाला. “अक्षर घटवावे, चित्रे काढावीत, वाचन करावे...” ही त्यांची जीवनदृष्टी त्यांच्या लेखनातून स्पष्टपणे जाणवते.

'डोह', 'सोन्याचा पिंपळ', 'पाण्याचे पंख' आणि 'कोरडी भिक्षा' यांसारख्या साहित्यकृतींमधून त्यांनी मानवी जीवन, निसर्ग आणि भावविश्व यांचे अत्यंत सूक्ष्म आणि प्रभावी चित्रण केले आहे.

त्यांच्या लेखनात बालपणाच्या आठवणी, निसर्गाशी संवाद आणि जीवनातील गूढ अनुभव यांचे अनोखे मिश्रण दिसते. शब्दचित्रांच्या माध्यमातून वाचकांना एका वेगळ्याच अनुभूतीच्या विश्वात घेऊन जाण्याची ताकद त्यांच्या लेखनात आहे.

ललित लेखनाला एक नवे परिमाण देणारे आणि मराठी साहित्य समृद्ध करणारे लेखक म्हणून श्रीनिवास विनायक कुलकर्णी यांचे स्थान अत्यंत मानाचे आहे.

महाराष्ट्र राज्य शासनाचा कवी विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार २०२५

प्रख्यात ललित लेखक श्रीनिवास विनायक कुलकर्णी यांना त्यांच्या साहित्य क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी 'विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार २०२५' प्रदान करण्यात आला आहे.

लेखकांच्या सदिच्छा

नामांकित साहित्यिकांकडून मिळालेल्या मनःपूर्वक शुभेच्छा

श्रीनिवास विनायक कुलकर्णी
हिमांशू भूषण स्मार्त
डॉ. सुनीलकुमार लवटे
प्रतिभा रानडे
डॉ. स्मिता कोल्हे
कवी अशोक नायगावकर, महेश केळुस्कर आणि अरुण म्हात्रे
सुधांशु नाईक
आंतराराष्ट्रीय चित्रकार संजय शेलार
कृष्णात खोत : साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त